आज 'मिशन रोजगार' अंतर्गत पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू केलेल्या 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' माध्यमातून कोल्हापुरातील 'विलो इंडिया' कंपनीचे संदीप सावंत आणि युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीचे संतोष क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला.
यावेळी, कोल्हापुरातील युवक-युवतींना कोल्हापूरातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या मिशन रोजगार संदर्भात माहिती दिली. तसेच, या कंपन्यांमधील उपलब्ध रोजगाराच्या संधी व लागणारी कौशल्ये याबाबत सविस्तर चर्चा केली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments