Search

आज भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील माझ्या अनेक युवा ...

आज भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील माझ्या अनेक युवा मित्र-मैत्रिणींनी तसेच उद्योजक बांधवांनी त्यांच्या नव्या व्यवसाची सुरवात केली. त्यांच्या या नव्या प्रवासाची सुरवात त्यांना माझ्या हस्ते करावेसे वाटले हे मी माझे भाग्यच समजतो. इतरांपेक्षा थोडी वेगळी वाट चालून स्वतःच्या कर्तृत्वावर एक वेगळी ओळख निर्माण करण्याची या सर्वांची तगमग पाहून एक आत्मिक समाधान मला नक्कीच मिळते.

आज वडणगे गावातील प्रवीण चौघुले यांच्या नूतन हॉटेलचे, कोल्हापुरातील प्रसिद्ध मेजर टेलर यांच्या नवीन मेजर कॉलेक्शनचे, नागदेववाडी येथील सेलिब्रेट केक शॉपीचे, श्री. किशोर देसाई यांच्या राजारामपुरी येथील गार्गीज मॉड्युलर किचनचे, कसबा बावडा येथील हॉटेल मृदगंध, शाहूपुरी येथील श्री. ओंकार देशपांडे यांच्या केदार अकॅडमी क्लासेसचे उदघाटन यावेळी केले आणि या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments