आज पहाटे ३ वाजता विद्युत बिघाडामुळे सीपीआर रुग्णालयातील ट्रॉमा केयर सेंटरमध्ये दुर्दैवी प्रकार घडला. मात्र, सीपीआरच्या डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य वैद्यकीय स्टाफ यांनी दाखविलेल्या तत्परतेने तेथील रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. सदर ठिकाणी भेट देऊन परिस्थतीची पाहणी केली.
यावेळी, घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन संपूर्ण सीपीआर रुग्णालयाचे इलेक्ट्रिकल ऑडीट महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडून करून घेण्याच्या सूचना दिल्या असून सदर घटनेची वैद्यकीय शिक्षण समितीकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार आहे.
यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के, गटनेते शारंगधर देशमुख आदी उपस्थित होते.
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर
Comments