आज ना. हसन मुश्रीफजी व पालकमंत्री ना. सतेज पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनाबद्दल जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीमध्ये सहभाग घेतला.
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर, खालील विषयांवर उपस्थितांचे लक्ष वेधले.
१. दुर्दैवाने पूर परिस्थिती उपलब्ध झाली तर, रे
शन कार्ड धारकांना पुरेशा प्रमाणात रेशन उपलब्ध होईल याबाबतचे नियोजन करावे.
२. कोरोनामुळे सार्वजनिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे बनले आहे, त्यामुळे संभाव्य पुरामध्ये आणि पूर ओसरल्यानानंतर औषध फवारणी, सॅनिटायझेशनचे पूर्वनियोजन करणे महत्वाचे आहे.
३. गतवर्षी महापुरामध्ये शेतीपंपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी, शेतकरी बांधवाना आधीच पूर्व सूचना देऊन शेतीपंपाचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
४. गेल्यावर्षीच्या महापूरमध्ये सर्वच स्वयंसेवकांनी अत्यंत कौतुकास्पद काम केले होते, ही संभाव्य पूर परिस्थिती पाहता या सर्व स्वयंसेवकांसाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून सर्व इच्छुक स्वयंसेवकांना त्यावर नोंदणी करता येईल.
- आ. ऋतुराज पाटील
コメント