आज कृषी मंत्री ना. दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीमध्ये, ग्राम कृषी विकास समिती स्थापन करून तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थितीवर आधारित कृषी आराखडा सादर करण्याच्या सूचना ना. दादाजी भुसे साहेबांनी दिल्या.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
コメント