आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गिरगांव गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, गावातील महादेव मंदिर समोरील हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच श्री पूर्णानंद महाराज यांच्या मंदिराला भेट देऊन मंदिर उभारणी कामांचा आढावा घेतला यावेळी मंदिराच्या हॉल उभारणीसाठी मी प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
याचसोबत, नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. गिरगांवच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेल्या या संधीचे सोनं करण्याचे आवाहन सदस्यांना केले.
यावेळी, महादेव कांबळे, आनंद पाटील, संभाजी कोंडेकर, माधव कुरणे, श्रीरंग चव्हाण, दिलीप जाधव, सुरेश साळोखे, रघुनाथ साळोखे, भिकाजी कुरणे, चंदर कुरणे, पांडुरंग खेडेकर, डी. एस. पाडळकर, अनिल सावंत,विलास सावंत, महादेव कुरणे, सुभाष पाटील, प्रल्हाद जाधव, सर्जेराव कोंडेकर, प्रमोद पाटील, अनिल म्हेत्रे, ऋतुराज कोंडेकर, प्रकाश खेडेकर, प्रसाद सावंत, विलास गायकवाड तसेच नवनिर्वाचित सदस्य उत्तम पाटील, उत्तम पाटील-नवाळे, जालंधर पाटील, संतोष सुतार, शुभांगी कोंडेकर, अर्चना सावंत, गीता पाटील, वैशाली परीट, अर्चना गुरव, शीतल चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentários