इस्पुर्ली गावाचे दैवत हालसिद्धनाथ मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. त्याचसोबत गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कामाचा देखील यावेळी शुभारंभ करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे काही काळ लांबलेल्या विकास कामांना आता हळूहळू गती येऊ लागली आहे. पण, संकटाची तीव्रता कमी झाली असली तरी संकट अजून संपलेले नाहीये. त्यामुळे, आपण सर्वांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या उदघाटन प्रसंगी, माजी जि.प.सदस्य एकनाथ पाटील, ग्रामसेवक मनीषा निकम, गावाच्या तलाठी जानकी मिराशी, गजानन पाटील शंकर मगदूम, विलास चौगुले, राजाराम पाटील, राजाराम चौगुले सविता पाटील (माजी सरपंच), प्रदीप शेट्टी, तात्यासो कांबळे, आर. डी. कांबळे, प्रदीप शेटे, दशरथ गुरव, लखन बाबर, संदीप बाबर, प्रशांत पाटील, निलेश पाटील, राजाराम पाटील, राहुल गायकवाड, बंडोपंत लोहार, गणेश पाटील, जयवंत पोर्लेकर, राहुल पाटील तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील
Comments