आज कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थीती व कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार जी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी, 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' या उपक्रमाविषयी तसेच, उद्योग व्यवसायांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या प्रशिक्षणावर भर देणेबाबत तसेच उद्योगांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
यावेळी, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे, आ. पी. एन. पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजीव आवळे, आ. राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments