आज कसबा बावड्यातील सर्व नगरसेवक व श्रीराम सोसायटीची पदाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रूग्णांसाठी कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत अधिकाऱ्यांशी बोलून लवकर हे सेंटर सुरू करणार असल्याचे तसेच याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.
कोरोना सेंटर उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, महापुराच्या पार्श्वभुमीवर नागरिकांचे स्थलांतर, त्यांना लागणारे जेवण, आरोग्य सुविधा, पाणी वाटपाचे नियोजन यावर चर्चा होवून अन्य सुविधा सज्ज ठेवण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी नगरसेवक मोहन सालपे, अशोक जाधव, सुभाष बुचडे, डॉ.संदीप नेजदार, माधुरी लाड, स्वाती यवलुजे श्रावण फडतारे आणि श्रीराम संस्थेचे संचालक उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील
Comments