आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी नगर परिसरामध्ये भेट देऊन सांडपाणी व पावसाच्या पाण्याचे योग्य निचरा होण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापुरातील देवकर पानंद चौकात तपोवन, आयटीआय, नाळे कॉलनी, सुर्वे नगर यासह आजूबाजूच्या 8 ते 10 वॉर्डातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी देवकर पानंद चौकात येते. त्यामुळे दर पावसाळ्यात पावसाचे पाणी अधिक सांडपाणी मिळून प्रवाह मोठा होत असल्याने प्रभाग क्रमांक 70 मधील राजलक्ष्मी नगर परिसरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर आज शारंगधर देशमुख, महापालिका उपायुक्त निखील मोरे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेविका दीपा मगदूम आणि स्थानिक नागरिकांसह पाहणी केली. सदर पाण्याची समस्या दूर करण्यासाठी यापूर्वीच निधी मंजूर करण्यात आला असून येत्या दोन दिवसात महापालिकेने हे काम सुरू करावे अशा सूचना केल्या असून डीपीडीसीच्या माध्यमातून आणखी फंड उपलब्ध करून यावर योग्य तोडगा तात्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी उमेश पाटील, दीपक गुंडप, कुणाल पक्की, प्रशांत पाटील, रोहित गाडीवडर, विजय मगदूम, संदीप निकम आदी उपस्थित होते
Comments