अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम

करवीर निवासिनी श्री. अंबाबाई आपल्या संस्कृती मधील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणून पूजनीय आहे. या अंबामातेच्या चरणी सेवा वृत्तीने दरवर्षीप्रमाणे प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत 'क्लीन कोल्हापूर या उपक्रमामधून श्री.अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी, शहरातही अनेक विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला बचत गट, सामाजिक संस्था आदींनी यामध्ये सहभाग नोंदविला. - ऋतुराज पाटील