top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

अच्छे दीन चे स्वप्न संपूर्ण देशातील जनतेला दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले ..पण सत्ता येऊन 7 वर्षे...

अच्छे दीन चे स्वप्न संपूर्ण देशातील जनतेला दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले ..पण सत्ता येऊन 7 वर्षे झाली पण इव्हेंट मॅनेजमेंट आणि स्वतः ची प्रतिमा निर्माण करणे, यापलीकडे मोदी सरकारने काही केले नाही.. या विरोधात आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष ना. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

एका रात्रीत नोटा बंदी करून मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पूर्ण मोडून टाकली ..GST आणला पण तो व्यापारी आणि उद्योजक यांच्या मुळावर उठला आहे. युवा पिढीला रोजगार देतो असे सांगितले पण देशातील बेरोजगारी वाढत निघाली आहे.. पेट्रोल चा दर 100 रुपये झाला आहे. शेतकरी विरोधात कायदे केले.

देशात असलेल्या बँका, पेट्रोलियम कंपन्या, रेल्वे, विमानतळ अश्या गोष्टी चे खाजगीकरण करून आपल्या दोन उद्योगपती मित्रांना खुश करण्यासाठी देशाचे वाटोळे करायला निघाले आहेत. आजच्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध केला.

या आंदोलनात आमदार पी एन पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, तौफिक मुल्लानी , सचिन चव्हाण, किशोर खानविलकर,संपतराव पाटील, दिपक थोरात,पार्थ मुंडे,बाळासाहेब खाडे,अक्षय शेळके,उदय पोवार, सरफराज रिकीबदार, प्रवीण पाटील,संध्या घोटणे, सुलोचना नायकवडी, मंगल खुडे, पूजा आरडे , उज्वला चौगले,वैशाली पाडेकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

-- *आमदार ऋतुराज पाटील*7 views0 comments

Komentar


bottom of page