कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांनी ३, आमदार चंद्रकांत जाधव आणि माझ्या स्थानिक आमदार निधीतून प्रत्येकी १ असे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी ३ आणि ग्रामीण क्षेत्रासाठी २ (आजरा १, इचलकरंजी १) अशा एकूण ५ रूग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. तसेच, घाटगे पाटील ग्रुपच्यावतीने कोव्हिड-19 साठी शववाहिका देण्यात आली
यावेळी, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक दिलिप पोवार, महिला व बालकल्याण सभापती शोभा कवाळे, प्रभाग समिती सभापती रिना कांबळे, तेज घाटगे, अमोल नेर्ले, आशपाक आजरेकर, सुनील पाटील उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
コメント