१३ ऑक्टोबर, १९५९ रोजी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा व भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या शुभहस्ते 'कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी इमारतीचे' भूमिपूजन तत्कालीन जिल्हाध्यक्ष देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला होता.
गेली, ६१ वर्षे काँग्रेस पक्षाचे विचार, मूल्य कोल्हापूर जिल्ह्याच्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणारे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी अविरत काम करणारे काँग्रेस पक्षाचे हजारो सच्चे कार्यकर्ते यांचे काँग्रेस कमिटीशी जिव्हाळ्याचे नाते आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष देशभक्त रत्नाप्पा कुंभार, दिनकराव मुद्राळे, बाबासाहेब खंजीरे, व्ही. के. चव्हाण, उदयसिंहराव गायकवाड,पी.एन.पाटील यांच्यानंतर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसची हीच परंपरा पुढे घेऊन जाण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर
Comments