top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

स्थायी समितीचे माजी सभापती श्री. शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून सव्वा दोन कोटी रुपयांच्या ....

स्थायी समितीचे माजी सभापती श्री. शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीतून रंकाळा पदपथ उद्यानात स्वयंचलित पद्धतीने (रोबोटिक सेन्सरने) तयार करण्यात आलेले सजीव भासणारे प्राणी, रंकाळा सुशोभीकरण, पदपथ उद्यानातील विविध विकासकामे, अमृत योजनेअंतर्गत पुर्ण केलेली विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शारंगधर देशमुख यांनी प्रभागातील आणि शहरातील लोकांसाठी नाविन्यपूर्ण अशी कामे करण्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. 21 फुटी गणेश विसर्जन होत असलेल्या इराणी खणी मध्ये आकर्षक कारंजा त्यांनी बसविला आहे. आणि आज रंकाळा पदपथ उद्यानात स्वयंचलित पद्धतीने (रोबोटिक सेन्सर बसविलेले) तयार करण्यात आलेले सजीव भासणारे प्राणी, रंकाळा परिसर सुशोभीकरण, पदपथ उद्यानातील विविध विकासकामे, अमृत योजनेअंतर्गत पुर्ण केलेली विकास कामे असा जवळपास दोन कोटी पंचवीस लाख रुपये निधी यासाठी यासाठी खर्च केला आहे.

प्रथमच आपल्या कोल्हापूर शहरात रंकाळा पदपथ उद्यानात रोबोटिक सेन्सर असलेले विविध प्रकारचे प्राणी बसविले आहेत. त्याद्वारे, कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सौंदर्यामधे भर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

आपले कोल्हापूर हे स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूर हे आपले वाटले पाहिजे. कोल्हापुरात अनेक ठिकाणी भेट देताना रंकाळा तलावाला पर्यटक आवर्जून भेट देतात. आपल्या कोल्हापूरकरांचे रंकाळाशी जिव्हाळ्याचे नाते आहे. आणि हे नाते यापुढील काळात दृढ करूया. आपले कोल्हापूर सुंदर बनविण्यासाठी यापुढील काळातही सर्वजण मिळून प्रयत्न करूया. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण यासाठी नक्की कार्यरत राहू.

या उदघाटन प्रसंगी ही सुरेख आणि आकर्षक शिल्पे बघून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह मलाही आवारात आला नाही.

यावेळी, मा. वसंतराव देशमुखदादा, शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, राजेंद्र पाटील, श्रीमती दीपा मगदूम, रिना कांबळे, सौ. माधुरी लाड, सचिन पाटील, नेत्रदीप सरनोबत, सौ. पल्लवी बोळाईकर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील9 views0 comments

Yorumlar


bottom of page