शिवाजी विद्यापीठाच्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आयडी पासवर्डबाबत विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. गजानन पळसे यांच्याशी याबाबत आताच चर्चा केली.
विद्यार्थ्यांना आयडी पासवर्ड मोबाईल वर तसेच मेल वर पाठवण्यात येत आहेत. उद्या पर्यंत सर्व विद्यार्थांना सदर माहिती पोहचविण्यात येणार आहे. तरी, ज्या विद्यार्थ्यांना सदर माहिती प्राप्त झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या हेल्पलाईन वरून कॉल करून सदर माहिती फोन द्वारे देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पळसे यांनी दिली आहे.
माझी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना विनंती आहे, उद्या पर्यंत ज्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाला नसेल त्यांनी officeofruturajspatil@gmail.com या मेल आयडी वर संपर्क करावा.
तसेच, मॉक टेस्टसाठी अनिवार्य असलेला वेबकॅमचा विकल्प मुख्य परीक्षेसाठी अनिवार्य नाही म्हणजेच प्रोक्टर्ड पद्धतीने होणार नाही, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
मित्रमैत्रिणींनो, काळजी करू नका, विद्यापीठ प्रशासन परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणाचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची मी खात्री देतो. मन लावून अभ्यास करा. शुभेच्छा!
- आ. ऋतुराज पाटील

Comments