top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

व्हॅलेंटाईन डे... प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.

प्रेमाची व्याख्या ही खूप व्यापक आहे. आणि ती आपण सर्वांनी जपायला हवी .. आज आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना त्यांच्या बद्दलच आपलं प्रेम बोलून दाखवतो. पण असे अनेक लोक असतात ज्यांच्याविषयी आपल्याला खूप प्रेम, आदर वाटत असतो. पण प्रेमाच्या सीमित झालेल्या व्याख्येमुळे आपण ते व्यक्त करत नाही. खरं पाहिलं तर यांना आपल्या हृदयात स्थान असतं. आपले जवान हा त्यातील मुख्य घटक.आपल्या देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या या जवानांबद्दल आपल्याला प्रेम आणि आदर असतो. हे जवान कधीही आपल्याला दिसले की आपण मनातून त्यांना सॅल्युट करतो. आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने , देशरक्षणासाठी झटणाऱ्या या जवानांना त्यांच्या सहृदयी व्यक्तींकडून थेट शुभेच्छा मिळत असतील का ? असा विचार मनात आला. ऊन, वारा ,पाऊस, सण ... काहीही असो, हे सगळे जवान आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर कुठेतरी सेवा बजावत असतात , म्हणून आपण सुरक्षित असतो.या जवानांची बायको, आई, प्रेयसी, भाऊ, वडील आपापल्या गावी असतील, त्यांना आज एकमेकांना भेटता येणार नाही ..आणि म्हणून आपणच जवानांना शुभेच्छा द्यायला जायचे ,असा निश्चय केला. कोल्हापूरातील मराठा बटालियन मध्ये गेलो.समोर आलेल्या प्रत्येक जवानाला भेटलो,गुलाबाचे फूल दिले आणि मनापासून गळाभेट घेतली. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.या जवानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ऊर अभिमानाने भरून आले. खूप बरं वाटलं! त्यांच्या या भेटीने माझा व्हॅलेंटाईन डे तरी अविस्मरणीय झाला.आपलाही होवो, या सदिच्छा.

- आ. ऋतुराज पाटील



4 views0 comments

Comments


bottom of page