top of page

वाहतूक पोलीसांना या एलईडी बॅटनचे वाटप करण्यात आले....

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Dec 20, 2020
  • 1 min read

कोणत्याही शहरातील वाहतुकीची कोडी दुर करण्यासाठी वाहतूक पोलीसांची भुमिका महत्वाची असते. अनेकदा रात्रीच्या वेळी लाईट गेल्यास ड्युटीवर असणार्‍या वाहतुक पोलीसांना वाहतूक सुरळीत करण्यास विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेवून गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांनी कोल्हापूर शहर वाहतूक पोलीसांना एलईडी बॅटन वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार कोल्हापूर शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या उपस्थितीत कावळा नाका येथे वाहतूक पोलीसांना या एलईडी बॅटनचे वाटप करण्यात आले. तसेच कोल्हापुरातील वाहतुक पोलीसांच्या सोईसाठी भविष्यात विविध प्रकारच्या आधुनिक सोई कशा पुरवता येतील याचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी माजी उपमहापौर संजय मोहीते, माजी नगरसेवक राजू लाटकर, मोहन सालपे, महेश जाधव, शाहुपूरी पोलीस निरिक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सागर यवलुजे, रवी चौगुले, विनायक सुर्यवंशी, बाबू बुचडे, पप्पु सरनाईक, विशाल चव्हाण, भरत सोनवणे यांच्यासह वाहतूक पोलीस कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comentarios


bottom of page