Search

व्यर्थ न हो बलिदान!

व्यर्थ न हो बलिदान!

भारतमातेचे रक्षण करताना जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे सुपुत्र ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी बहिरेवाडी (ता. आजरा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारमातेच्या रक्षणासाठी ऋषिकेश यांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान कोल्हापूर तसेच संपूर्ण देश कधीच विसरू शकणार नाही. ऐन दिवाळीमध्ये जोंधळे कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

- ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर0 views0 comments