वडणगे सारख्या छोट्या गावातून अगदी लहान वयापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या आणि नुसती आवड नाही तर आपल्या कृतीतून प्रत्येकवेळी याची जाणीव करून देणारे डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचा आज वाढदिवस.
मला अजून आठवतंय, महाविद्यालयीन शिक्षण संपवून नुकताच मी माझ्या सामाजिक आयुष्याला सुरवात करत असताना आर.पी. ग्रुपच्या माध्यमातून कोल्हापुरातील युवक-युवतींचे संघटन करणे, यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणे, जिल्ह्यातील तरुण-तरुणांचे प्रश्न सोडविणे अशा अनेक गोष्टींमध्ये नरके सरांचे मला मार्गदर्शन लाभले.
डॉ. डी. वाय. पाटील साहेब, डॉ. संजय पाटील साहेब, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब आणि माझ्यासोबतच संपूर्ण डी. वाय. पाटील कुटुंबीयांशी सरांचे गेली २५ वर्षे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना जीएस पदावरून त्यांनी केलेले काम आजही कौतुकास्पद आहे. कॉलेजचा विद्यार्थी ते कॉलेजचे प्राचार्य पर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक होतकरू युवक-युवतींसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
गेली २० वर्षांमध्ये शिव साई ग्रुप, डी. वाय. पाटील ग्रुपच्या मदतीने आणि वैयक्तिक रित्यासुद्धा त्यांनी अनेक तरुणांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडविले आहे. त्यांचे कित्येक विद्यार्थी-विद्यार्थींनी आज देशविदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटविला आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतांना सोबत असणारी टीम खूप महत्वाची आहे. माझ्या या टीम मध्ये नरके सरांसारखे शिलेदार आहेत याचा मला अभिमान आहे.
नरके सर आज आपल्या वाढदिनी माझ्याकडून आणि डी. वाय. पाटील परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा ! आई अंबाबाई आपणास निरोगी दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना..!
- आ. ऋतुराज पाटील
Comments