आज कोल्हापुरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिडाई कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लाईन बाजार येथील महासैनिक ट्रेनिंग सेंटर येथे ६० ऑक्सिजन बेड डेडिकेटेड हेल्थ सेंटरचे आज लोकार्पण मा. पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
या सेंटरमध्ये दाखल होणारी कोरोना रुग्णांना कोरोनाचे योग्य उपचार मिळतील तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा सुलभतेने व्हावा यासाठी क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांनी स्वनिधीतून खरेदी केलेले ड्यूरा सिलेंडर सुपूर्द करण्यात आले.
क्रिडाई कोल्हापूर या बांधकाम व्यावसायिक शिखर संघटनेने बांधकाम व्यवसाय वाढीसोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक विकासात्मक आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमधे सुद्धा क्रिडाईने कोल्हापूरमध्ये महापालिकेसोबत अनेक कोविड केयर केंद्र उभे केले होते.
यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र क्रिडाईचे माजी अध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, प्रदीप भारमल, गौतम परमार आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments