top of page
Search

लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी येथे ३० बेडचे लहान मुलांसाठी डेडीकेटेड कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

Writer's picture: Nilesh PatilNilesh Patil

आगामी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका आणि फॅार्टी वनर क्लब ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या सहकार्याने लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी येथे ३० बेडचे लहान मुलांसाठी डेडीकेटेड कोविड केअर सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

फॉर्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष उत्तम फराकटे यांनी संस्थेमार्फत ४० लाख रुपायांचे वैद्यकीय साहित्य आणि औषधे उपलब्ध करून दिली आहेत. यामध्ये ७५ बेडस्, गाद्या, सर्व लिनन, ७४ साईड टेबल्स, १७ कॅान्सनट्रेटर्स, ४ बायपॅप मशीन्स, ४ नेब्युलायझर्स, २ सक्शन मशीन्स, २७ आय व्ही स्टॅंडस्, ५ मल्टी पॅरा मॉनिटर्स, ऑक्सिजन मास्क अशा विविध उपकरणांचा समावेश आहे. याबद्दल, मी उत्तम फराकटे व त्यांच्या सर्व टीमचे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो.

आजपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई आपण सर्वजण मिळून लढत आहोत. फॉर्टी वनर्स क्लब्ज ऑफ इंडिया राऊंड टेबल ट्रस्ट सारख्या नामवंत संस्थांनी यासाठी मदतीचा हात पुढे करून प्रशासनाला या लढाईत मदत केली आहे.

कोरोनाचे हे संकट लवकर दूर होवो. भविष्यात अशी नवी सेंटर उभा करण्याची वेळ आपल्या वर यायला नको, आणि जी सेंटर आहेत ती लवकर बंद होऊन जनजीवन लवकर पूर्ववत सुरू होवो, हीच आई आंबाबाई चरणी प्रार्थना.

यावेळी, आयुक्त कादंबरी बलकवडे, अध्यक्ष उत्तम फराकटे, माजी नगरसेवक राहुल माने, उपायुक्त निखील मोरे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्लबचे उपाध्याक्ष रवी डोली, सदस्य महेश खाडंके, बीपीन मिरजकर, रवी पाटील, सौ. शीतल फराकटे, श्रीकांत पाटील, गणेश सावंत, प्रदीप भारमल, नारायण भोसले, डॅा. विजय पाटील आदी उपस्थित होते.



6 views0 comments

コメント


bottom of page