रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी जरगनगर रस्त्यावरील पूलासाठी रु.1.20 कोटी निधी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी जरगनगर रस्त्यावरील पूल 2019 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. सदरचा पूल पुन्हा बांधावा अशी मागणी या भागातील नागरिकांची होती. त्यानूसार हा पूल पुन्हा बांधण्यासाठी शासनाच्या नगरोत्थान योजनेतून रु.1 कोटी 20 लाख चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या पुलाची पाहणी पालकमंत्री ना. सतेज पाटील, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले यांच्यासमवेत केली.
यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाने, उपशहर अभियंता एन एस पाटील, रामकृष्ण ठाकूर, अशोक कुलकर्णी, सुधीर चरणकर, युवराज गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
-आ. ऋतुराज पाटील
Comments