कोल्हापूर शहरात अनेक झाडांवर खिळे मारून जाहीरात केली आहे. या झाडांचे संवर्धन व्हावे ,यासाठी येत्या रविवार, ३ जानेवारी, २०२० सकाळी ९ वाजता रोजी "खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर" हा व्यापक उपक्रम कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने संपूर्ण कोल्हापूर मध्ये राबविण्यात येणार आहे.
वृक्षारोपण जशी काळजी गरज आहे तशीच वृक्ष संवर्धन सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे माझी सर्व कोल्हापूर वासियांना विनंती आहे, आपल्या कोल्हापूर शहरातील झाडांच्या संवर्धनासाठी या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9022909599 या नंबरवर मिसड कॉल द्यावा. दि. ३ जानेवारी रोजी होणाऱ्या या मोहीमेबद्दलची पुढील माहिती आपल्याला कळवली जाईल.
ज्या लोकांनी अथवा व्यावसायिकांनी झाडांवर खिळे मारून जाहीरात अथवा कोणत्याही प्रकारचे फलक लावले असतील, त्यांनी 3 जानेवारीपूर्वी स्वतःहून खिळ्यासह फलक काढून घ्यावेत, असे आवाहन करतो. चला सर्वजण मिळून कोल्हापूरला 'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' बनवूया!
या बैठकीला हॉटेल मालक संघटना, रोटरी क्लब, वृक्षप्रेमी संघटना, कोल्हापूर जिल्हा माऊंटनेरिंग असोसिएशन, रबीनहुड संस्था, अवनी संस्था, व्हाइट आर्मी, निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी यांच्यासह सुमारे 50 संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
- ना. सतेज (बंटी) डी. पाटील पालकमंत्री, कोल्हापूर
Comentários