युगप्रवर्तक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त कोल्हापुरातील आयोजित जन्मकाळ.....
- Nilesh Patil
- Feb 19, 2021
- 1 min read
युगप्रवर्तक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त कोल्हापुरातील आयोजित जन्मकाळ सोहळ्याला उपस्थित राहून शिवस्मारकाचे पूजन करून अभिवादन केले. जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
यावेळी, श्रीमती छत्रपती शाहू महाराज, खा. संजय मंडलिक, दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक डॉ. योगेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे तसेच आदी मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments