माझ्या वाढदिवसादिनाच्या शुभेच्छा गरजू लोकांना मदत करून देण्याचे आवाहन मी केले होते...
- Nilesh Patil
- May 31, 2021
- 1 min read
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या माझ्या वाढदिवसादिनाच्या शुभेच्छा गरजू लोकांना मदत करून देण्याचे आवाहन मी केले होते. याच पार्श्वभूमीवर माझे मित्र, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून गरजू लोकांना मदत केली. गरजूंना धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू, सॅनिटायझर, औषधे, फूड पॅकेट व दूध वाटप, फळे वाटप आदी उपक्रम घेण्यात आले. ऋतुराज पाटील फौंडेशनच्या वतीने कोल्हापूर शहर तसेच दक्षिण मतदार संघातील कोव्हीड सेंटरमधील रुग्ण आणि फ्रंटलाईन वर्कर, वृध्दाश्रम, बालकल्यान संकूल यांना 6 हजार वाफेचे मशीन्स देण्यात येणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि आ. चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फ्रंट लाईन वर्करना प्राथमिक स्वरुपात वाफेची मशीन देण्यात आली.
माझ्या या विनंतीला मान देत आपण सर्वांनी कोरोनाच्या या संकट काळामध्ये गरजू नागरिकांना मदतकेल्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. मला विश्वास आहे, आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपण लवकरच कोरोनावर मात करू.
-आ. ऋतुराज पाटील
Comments