top of page

मराठा क्रांती मूक आंदोलनात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांसोबत सहभागी होऊन पाठिंबा दिला

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 16, 2021
  • 1 min read

आज कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांसोबत सहभागी होऊन पाठिंबा दिला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची, त्यांची सर्व अर्थाने प्रगती व्हावी, यासाठी ऐतिहासिक काम केले आणि हाच आदर्श आमच्या सर्वांच्या समोर आहे.

आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक गोष्टी राजकारणापलीकडे जाऊन यशस्वी केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकासआघाडी सरकार आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आग्रही आहोतच. पण, आता गरज आहे ती एकदिलाने, एकजुटीने ही लढाई लढण्याची.

मराठा समाजाच्या आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्याकडे कोणीही राजकीय दृष्टीने पाहू नये, असे मला वाटते. या आधीच्या सरकारने आरक्षणाचा ठराव आणला, तेव्हा सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या ठरावाला पाठिंबा दिला त्यामुळेच, महाराष्ट्राच्या विधीमंडळाने कायद्यात रुपांतर तातडीने झाले.

मराठा आरक्षणाची ही घटनात्मक आणि कायदेशीर लढाईत यशस्वी ठरली, तर संपूर्ण भारतातील विविध समाज घटकांतील कोट्यवधी नागरीकांच्या शिक्षण आणि रोजगाराचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला पुरोगामी दिशा दिली, असा इतिहास आहे. तोच उज्ज्वल वारसा मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जपण्याची संधी आहे. मराठा समाजातील हजारो युवक, युवती आणि विद्यार्थी यांची स्वप्ने या मराठा आरक्षण निर्णयाशी जोडली आहेत. त्यामुळे या युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून या लढाईत मी मराठा समाजाबरोबर आहे. आपण सर्वजण मिळून ही लढाई नक्की जिंकू असा विश्वास वाटतो.



 
 
 

Comments


bottom of page