माझ्या सेंट झेव्हीअर्स हायस्कुलमधील 2006 च्या बॅचमधील मित्रांच्या ' फ्रेंड्स ऑफ ऋतुराज' या ग्रुपतर्फे कोरोनापासून संरक्षण म्हणून सार्वजनिक ठिकाणी कार्यरत लोकांना चार हजार फेस शिल्ड उपलब्ध करून दिले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाची आहे. कोरोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सेवा देणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेचे सर्व सफाई कर्मचारी यांच्यासाठी दोन हजार फेस शिल्ड आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांकच्याकडे सुपुर्द करण्यात आले. त्याबरोबर लाईन बाजार सेवा रुग्णालय, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल,पंचगंगा हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल या ठिकाणी एक हजार फेस शिल्ड देण्यात आले. उर्वरित एक हजार फेस शिल्ड हे जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहेत.
महापालिका आरोग्य कर्मचारी हे स्वछता, कचरा उठाव यानिमित्ताने दररोज लोकांच्या संपर्कात आहेत.तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर आणि कर्मचारी सुद्धा उपचारात गुंतलेले असतात. फेसशिल्ड वापरल्याने संपूर्ण चेहरा झाकला जातोच पण खोकणे,शिंकणे यामुळे होणारा कोरोनाप्रसार रोखला जाऊ शकतो. यावेळी , 'फ्रेंड्स ऑफ ऋतुराज'ग्रुपचे रोहित शिंदे, हर्षवर्धन पाटील, सत्यव्रत जामसंडेकर,निशांत पटेल,मकरंद काईंगडे यांनी या उपक्रमासाठी समन्वय केला.महापालिका आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटील , प्राचार्य डॉ.महादेव नरके, डी.डी.पाटील, संदीप पाटील उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील
