पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी,.....
- Nilesh Patil
- Oct 31, 2020
- 1 min read
पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
कोल्हापूरमध्ये अद्ययावत विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. नुकताच राज्य सरकराने विमानतळ विस्तारीकरणासाठी रुपये १० कोटीचा निधी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीमध्ये, विमानतळ विस्तारीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, या सोबतच उर्वरित सर्व कामे ठरवून दिलेल्या दिवसांमध्येच पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments