top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे..

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते व ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. लोकप्रतिनिधी झाल्यावर लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात आपले फोन घ्यावेत, कामाच्या वेळी आपल्याला सहजपणे लोकप्रतिनिधींनी भेटावेत अशी अपेक्षा असते. ही अपेक्षा असणे हे क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी जनसंपर्क कार्यालय हा महत्वाचा भाग असतो. आसगवकर सर आमदार होऊन साधारपणे सव्वा महिना एवढा काळ झाला आहे. आणि एवढ्या काळात त्यांनी सर्व शिक्षकांना सोयीचे होईल अश्या मध्यवर्ती ठिकाणी आपले जनसंर्पक कार्यालय सुरु केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. पदवीधर आणि शिक्षक मध्ये 6 पैकी 4 जागा जिंकून महाविकास आघाडी सरकारने "कोणी काहीही म्हणू दे, आपण एकीने काम करून महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे "हा संदेश महाराष्ट्राच्या जनतेला दिला आहे. या पुढील काळातसुद्धा महाविकास आघाडी असेच यश मिळवेल असा विश्वास मला वाटतो. या उदघाटन प्रसंगी, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, के.पी. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, गुलाबराव घोरपडे, शुभांगीताई गावडे, धैर्यशील पाटील, वसंतरावदादा देशमुख, एस.डी.लाडसर, विजयसिंह मोरे, अशोक पाटील, सुनील पवार, सुभाष सातपुते तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील



36 views0 comments

Comments


bottom of page