top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

पाचगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलमधील व्यायामशाळा आणि कुस्ती मैदान मधील मातीचे पूजन ...

मा. पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या आणि माझ्या आमदार निधीतून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलमधील व्यायामशाळा आणि कुस्ती मैदान मधील मातीचे पूजन करण्यात आले.

खेळ हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. खेळामुळे हार जीत पचवायची ताकद निर्माण होते. आपले मन नेहमी प्रसन्न राहते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला फिटनेस सुद्धा खूप चांगला राहतो. या गोष्टींचा विचार करून दक्षिण मतदासंघात प्रत्येक गावात क्रीडांगण व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

कुस्ती खेळत असताना मातीतील कुस्ती बरोबर मॅट वरील कुस्ती ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. म्हणून या कुस्ती संकुल मध्ये 3 लाख रुपयांचे मॅट उपलब्ध करण्यात देण्यात आला आहे.

याचसोबत पैलवानांसाठी स्वतंत्र व्यायामशाळेचे सुद्धा आज उदघाटन करण्यात आले. यापुढील काळातही दक्षिण मधील खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार म्हणून माझे नेहमीच प्रयत्न राहतील.

यावेळी, लोकनियुक्त संग्राम पाटील, उपसरपंच भाग्यश्री दळवी, नारायण गाडगीळ, संजय पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य-सदस्या, तसेच गावातील तरुण मंडळातील सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील5 views0 comments

Kommentare


bottom of page