राज्यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकरी वर्गाबरोबरच नागरी वस्त्यांचेही नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असल्याने, कोल्हापूर महानगपालिकेकडून या रस्त्यांच्या विकासासाठी रु. १७८.९८ कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी देणे संदर्भात मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांचीआमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समवेत आज नागपूर येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
- आमदार ऋतुराज पाटील

コメント