top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर सोमवारी विशेष लसीकरण मोहीम आयोजीत करण्याची....

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर सोमवारी विशेष लसीकरण मोहीम आयोजीत करण्याची विनंती पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाला केली होती. या नुसार आजपर्यंत तालुका आणि शहरस्तरावर एकूण 186 विद्यार्थी आणि नोकरदार यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आज कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रूग्णालयात परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी व नोकरदार यांच्यासाठी विशेष शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

आज सकाळी या ठिकाणी भेट देवून लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम दर सोमवारी आयोजीत करावी, अशी सूचना केली.

या मोहीमेअंतर्गत सुमारे 35 विद्यार्थी आणि नोकरदार यांना आज लस देण्यात आली. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, माजी नगरसेवक सचिन पाटील, प्राचार्य डॉ.महादेव नरके, नोडल अधिकारी शिल्पा दरेकर, डॉ.रूकसार मोमीन, गजानन हाबळे, शुभांगी गायकवाड, सपना कांबळे, आदित्य कांबळे, आनंदा करपे अक्षय शेळके, मुबीन मुश्रीफ आदी उपस्थित होते.5 views0 comments

Commenti


bottom of page