Search

नेर्ली गावाच्या दौऱ्यावर असताना गावातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवरभेट देऊन कामांचा आढावा घेतला

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नेर्ली गावाच्या दौऱ्यावर असताना गावातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवर भेट देऊन कामांचा आढावा घेतला. या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार असून याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवक-युवतींसाठी अद्ययावत वातानुकुलीत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे.

या नेर्ली गावातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. गावातील व परिसरातील स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होवोत यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

यावेळी, सरपंच प्रकाश पाटील, उपसरपंच संजय चौगले, अजित पाटील, हंबीरराव पाटील, जनार्दन पाटील, नंदु पाटील,अरवींद पाटील,अमर पाटील,संतोष पाटील,रायगोंडा पुजारी, प्रदीप चौगुले, निखील पाटील, अतुल पाटील, अजिंक्य पाटील,अमर नरके, अविराज कांबळे,अक्षय सडोले,राहुल लोखंडे आदी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments