नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या आपटे नगर प्रभाग मधील विविध विकास कामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
आज नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या आपटे नगर प्रभाग मधील विविध विकास कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. आधुनिक सोयीयुक्त 35 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन तसेच शिवगंगा मंदिर जीर्णोद्धार सोहळा व 40 लाख रुपये खर्चून करण्यात येणारे अंतर्गत रस्ते डाबरीकरण कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
यावेळी, नगरसेवक राजू दिंडोर्ले, विश्वास दिंडोर्ले, विशाल दिंडोर्ले, रणजित पाटील, बी जी सुतार, काशिनाथ गुळवणी, रणजित वरेकर, गणपतराव भित्तम, सतीश हाराळे, संदीप वनारे, गणेश वाईंगडे, गणेश लाड, प्रशांत कारेकर, प्रवीण कारंडे, एस. डी. पाटील, पांडुरंग जाधव, रवी जाधव, अनिल हळवे, मारुती खाडे उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील