top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

दिग्विजय, आदेश आणि राजेश यांनी सुरु केलेल्या या पर्यावरणपूर्वक कपचा वापर आपण सर्वांनी करूया आणि.....

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून चहा, कॉफी वगैरे पेय घेतल्यानंतर होणारा कचरा टाळण्यासाठी कागदी व प्लास्टिक कपचा पर्याय म्हणून कोल्हापूरमध्ये प्रथमच खाण्यायोग्य बिस्कीट कप बनविण्यात आले आहेत.

कोल्हापूरच्या दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन इंजिनिअर युवकांनी सुरु केलेल्या 'मॅग्नेट एडिबल कटलरी' या ब्रँड मार्फत उपलब्ध करण्यात आले आहेत.

मैद्यापासून बनविण्यात आलेले हे बिस्कीट कप आपण काही पेय घेतल्यानंतर चवीने खाऊ शकतो, काही कारणाने नाही खाऊ शकलो तर आपण इतरत्र फेकले तरी भटकी जनावरे ते खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच त्यांचीही भूक भागविण्याचे काम होते.

हे कप 'झिरो वेस्ट' या तत्वावर हे तयार करण्यात येतात. विशेष म्हणजे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्यानें त्यांनी स्वतः डिझाइन्स करून यासाठी लागणारी मशिन्स कोल्हापुरातच बनविली आहेत. यापुढे खाण्यायोग्य प्लेट्स, बाउल्स आदी प्रोडक्टस विकसित करण्यासाठीचे त्यांचे काम सुरु आहे.

दिग्विजय, आदेश आणि राजेश यांनी सुरु केलेल्या या पर्यावरणपूर्वक कपचा वापर आपण सर्वांनी करूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूयात. या तिघांनाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

- आ. ऋतुराज पाटील3 views0 comments

Comments


bottom of page