Search
  • Nilesh Patil

दक्षिण मतदार संघातील पायाभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आज ताराराणी गार्डन इथल्या महापालिकेच्या......

दक्षिण मतदार संघातील पायाभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आज ताराराणी गार्डन इथल्या महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात महापौर निलोफर आजरेकर आणि मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लॉकडाऊनच्या परिस्थिती असल्यामुळे कामे करण्यावर मर्यादा आली होती. त्यामुळे दक्षिण मतदार संघातील उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतांना काही कामे लवकरत लवकर पूर्ण होणे गरजेचे आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी यांनी खालील सूचना केल्या.

१) जी कामे रखडली आहेत, ती लवकरात लवकर करून घ्यावेत. २) जिथे पाणी टंचाई भासत असेल त्या ठिकाणी योग्य पाणी पुरवठा करावा. ३) पावसाळ्यात अनेकवेळा विज खंडित होते. त्यामुळे ब्लॅक स्पॉट निर्माण होतात. ते ब्लॅक स्पॉटवर काम करून त्या भागात लाईट उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.

या बैठकीला उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक अभिजित चव्हाण, नगरसेविका रीना कांबळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. - आमदार ऋतुराज पाटील0 views0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999