Search

डॉ.डी.वाय पाटील हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अशा सिमुलेशन आणि स्कील सेंटर प्रयोगशाळेचे उदघाटन.

आज पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ.डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या दूरदृष्टीने कदमवाडी येथील डॉ.डी.वाय पाटील हॉस्पिटलमध्ये कोल्हापूरातील अत्याधुनिक अशा सिमुलेशन आणि स्कील सेंटर प्रयोगशाळेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या नव्याने सुरू करण्यात आलेल्या या अत्याधुनिक सिमुलेशन आणि स्कील सेंटर ही प्रयोगशाळा डॉक्टर, संशोधक आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह वैद्यकीय क्षेत्राला दिशा देणारी आहे.

रुग्ण नसतांना सुद्धा रुग्णाला काय होऊ शकते? त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार केल्यानंतर त्याचा प्रतिसाद कसा मिळू शकतो, याबाबतची परिपूर्ण माहिती या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मिळण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना आणि वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्यांना अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळण्याबरोबरच एखादी गुंतागुंतीच्या रुग्णावर उपचार करण्याचा अनुभव याठिकाणी अनुभवता येणार आहे.

यावेळी डॉ.डी.वाय.पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, डॉ.डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्र कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, अधिष्ठाता डॉ.राकेश शर्मा, एचआर हेड श्रीलेखा साटम, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता, हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहायक प्रबंधक अजित पाटील यांच्यासह संस्थेतील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments