डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपतर्फे कसबा बावडा आणि लाईन बाजार येथे 30 हजार मास्क आणि 10 हजार सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप
डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपच्या वतीने कसबा बावडा आणि लाईन बाजार येथे 30 हजार मास्क आणि 10 हजार सॅनिटायझर बाटल्या वाटप करण्यात आले. डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील आणि पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे क्रमप्राप्त बनले आहे. घरी थांबणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरणे हे सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच या गोष्टी लक्षात घेऊन डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपतर्फे बावड्यातील ग्रामस्थांना मास्क आणि सॅनिटायझर द्यायचा उपक्रम राबविण्यात आला. बावड्यातील नगरसेवक, सोसायटीचे संचालक आणि तरुण मंडळाचे स्वयंसेवक यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक घरात 3 मास्क आणि 180 मिलीची सॅनिटायझर बाटली वाटप केले.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments