छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती निमित्त त्यांच्या जन्मस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केल
- Nilesh Patil
- Jun 26, 2020
- 1 min read
जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य,समता,बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. आज कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या त्यांच्या जन्मस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षींची जयंती कोल्हापुरात अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments