top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

चिंचवाड गावचे सुपुत्र जेष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. रावसो पाटील यांची 25 व्या अखिल भारतीय जैन मराठी...

चिंचवाड गावचे सुपुत्र जेष्ठ साहित्यिक, संपादक डॉ. रावसो पाटील यांची 25 व्या अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल व गौरव विशेषांक प्रकाशन समारंभ सोहळ्यामध्ये सहभागी झालो.

सोलापूर येथे होणाऱ्या 25 व्या अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल मी सर्वप्रथम डॉ. पाटील साहेबांचे मनापास अभिनंदन करतो आणि गावच्या भूमिपुत्राचा आपण सन्मान केला, याबद्दल सर्व चिंचवाड ग्रामस्थांचे कौतुक करतो.

डॉ.पाटील साहेब हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. संपादक, पत्रकार, आयुर्वेदिक क्षेत्रातील तज्ञ, साहित्यिक, इतिहास संशोधक असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत. सोलापूरमध्ये राहून सुद्धा त्यांनी चिंचवाड गावाशी नाते कायम ठेवले आहे.

डॉ. पाटील यांनी आजपर्यंत अडीच हाजराहून अधिक व्याख्याने दिली आहेत , हे वाखाणण्याजोगे आहे. इतिहास संशोधक म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर सुद्धा संशोधक म्ह्णून व्याख्याने दिली आहेत. अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज 25 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांच्या कामाचा सन्मान झाला आहे. यापुढेही त्यांच्या हातून असे कार्य घडेल आणि त्यांना विविध सन्मान मिळतील असा विश्वास मला वाटतो.

या मंगलप्रसंगी, जेष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक मा. डॉ. श्रीमंत कोकाटे, प्राचार्य श्रीधर हेरवडे, शाहीर करके, महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.डी.ए.पाटील, सरपंच सुदर्शन उपाध्ये, डॉ. महावीर अक्कोळे, विजय बेळंके, रामचंद्र नांद्रे, सौ. नीलम माणगावे, वि.दा. आवटी, अण्णासो ठिकणे, सिद्धोजीराव रणनवरे, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, दीपक मगदूम, प्रदीप झांबरे, सुरेश रोटे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील7 views0 comments

コメント


bottom of page