top of page
Search

गोरगरीब मजूर, कामगार आणि शेतकरी यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या.....

Updated: May 28, 2020

काँग्रेसच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी, मा. राहूलजी गांधी महाराष्ट्राचे प्रभारी मा. मल्लीकार्जुन खर्गेजी व प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुळे अडचणीत आलेल्या गोरगरीब मजूर, कामगार आणि शेतकरी यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने #SpeakUpIndia ही मोहीम हाती घेतली आहे.

हातावरचे पोट असणारे लोक, असंघटीक कामगार, कामगार, शेतकरी, शेतमजूर या सर्व वर्गांना आधार देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. राष्ट्र उभारणीत या वर्गाचा मोठा सहभाग आहे. आता हाच वर्ग संकटात असताना त्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. म्हणून केंद्र सरकारने या मागण्या तात्काळ मान्य करुन या सर्व वर्गातील अडचणीत आलेल्या नागरीकांना दिलासा द्यावा.4 views0 comments
bottom of page