Search

कोल्हापूर ही क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, नेमबाजी, टेनिस, मॅरेथॉन...

कोल्हापूर ही क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, कबड्डी, नेमबाजी, टेनिस, मॅरेथॉन अशा अनेक खेळांमध्ये कोल्हापुरातील खेळाडूंनीही देशपातळीवर आणि आंतराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

सुमारे ४० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या मेरी वेदर मैदानावरील मंडप दुरुस्ती व इतर सोयी-सुविधा उपलब्द करून देण्यासाठी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणमंत्री ना. आदिती तटकरेजी यांची भेट घेऊन लागणाऱ्या निधी बाबत चर्चा केली.

कोल्हापुरातील टेनिस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यस्तरीय व देशपातळीवरील स्पर्धा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यासाठी तसेच विविध मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यासाठी हे अद्ययावत टेनिस मैदान महत्वाचे ठरणार आहे.

- आ. ऋतुराज पाटील1 view0 comments