कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगदरम्यान येणारे अडथळे काढण्याच्या दृष्टीने पालकमंत्री नामदार सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाच्या दुसऱ्या सर्वेनुसार कळंबा पॉवर ग्रिडचे टॉवर अडथळा ठरत असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल. अडथळे ठरणारे ते टॉवर हटवण शक्य आहे का याबाबत प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पॉवर ग्रिडला भेट देवून पाहणी केली.
विमानांना मुडशिंगी गावाच्या बाजूनं नाईट लँडिग करणं शक्य होत असल्यास त्या मार्गात असणारा अतिउच्च दाबाचा लाईटचा टॉवर काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 48 लाखांची तरतूद केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी दिली.
यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कमलकुमार कटारिया, पॉवर ग्रीडचे हिमांशू रावत, मुख्य प्रबंधक व्ही एन प्रसाद प्रांताधिकारी वैभव नावडकर, करवीर तहसिलदार शितल मुळे-भांबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-आ. ऋतुराज पाटील
Comments