top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी २०१९ सालचा त्यांचा वाढदिवस साजरा...

कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी २०१९ सालचा त्यांचा वाढदिवस साजरा न करता २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्ये लक्ष्मीपूरी येथील कामगार चाळ येथील पडलेली तीन घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कामगार चाळीतील जयश्री जावीद, अनिता पंडत, किरण कांबळे यांना त्यांच्या हक्काचे घर पुन्हा मिळाले. आज या नविन बांधण्यात आलेल्या तीन घरांच्या चाव्या त्यांना सोपविण्यात आल्या. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून शारंगधर देशमुख यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद आमच्यासाठी नक्कीच ऊर्जा देणार होता. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतांना अडचणीत सापडलेल्यांना मदत केल्यानंतरचे समाधान अमूल्य असते.

यावेळी, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, गणी आजरेकर तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील4 views0 comments

Commentaires


bottom of page