top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा

कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदासंघासाठी असलेली ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे. अजिंक्यतारा कार्यालय मध्ये हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज सोमवार दि. ७ जून पासून उपलब्ध होणार आहेत.

सध्या सौम्य लक्षण असणारे अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घेत आहेत. काही वेळा या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यावेळी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपयुक्त आहेत. त्याचबरोबर कोरोना उपचार घेऊन घरी गेलेल्या काही रुग्णांना दमा यासारख्या आजारामुळे काही दिवस ऑक्सिजन द्यावा लागतो.

या गोष्टी लक्षात घेऊन ही ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बँक तयार केली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असेल त्यांच्या नातेवाईकानी यासंदर्भात डॉक्टरांचे पत्र, रुग्णाचे आधार कार्ड, आणि वापराबाबतचे एक हमीपत्र या गोष्टी देऊन हे मशीन घेऊन जायचे आहे. या बरोबरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कसा वापरावा यासंदर्भात मार्गदर्शन करणारा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत सहजपणे आणि आवश्यकतेनुसार घरी हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरता येणार आहे.

आज फुलेवाडी येथील एका वयोवृद्ध रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यांच्या नातेवाईकांकडे ना. राजेंद्र यड्रावकर साहेब यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी, आरोग्यराज्यमंत्री ना. राजेंद्र यड्रावकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजूबाबा आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, गोकुळचे संचालक अमर पाटील आदी उपस्थित होते.3 views0 comments

Comments


bottom of page