top of page
Search

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अजिंक्यतारा कार्यालय येथे..

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 21, 2021
  • 1 min read

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अजिंक्यतारा कार्यालय येथे मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

निवडणुकीपूर्वी निराधार नागरिकांच्या पेन्शन योजनेचा प्रश्न हाती घेतला होता. गेल्या वर्षभरामध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शनपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी संजय गांधी निराधार योजना समितीची स्थापना करून समितीच्या माध्यमातून काम सुरु केले. जानेवारी मध्ये 173, फेब्रुवारीमध्ये 155 आणि मार्च मध्ये 205 अशा एकूण ५३३ लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन सुरू करण्यात आली. यापैकी काही लाभार्थ्यांना आज पेन्शन मंजूर झालेल्या पत्रांचे वाटप करण्यात आले. आज या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करीत असतांना आनंद आणि समाधान आहे.

कोरोनाच्या या काळात योजना तळागाळात पोचविणे हे आव्हान असतांना समिती सदस्य या योजना गरजूपर्यंत पोचवत आहेत. या शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोचतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य संतोष कांबळे, शिवाजी राजिगरे, संगिता चक्रे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.



 
 
 

Comments


bottom of page