कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वड्डवाडी व दऱ्याचे वडगांव गावातील विविध विकास कामांचा शुभारंभआज करण्यात आला. यावेळी, वड्डवाडी गावातील सामाजिक सभागृह व रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. तर, दऱ्याचे वडगांव गावातील सामाजिक सभागृह, प्राथमिक शाळा नवीन खोली बांधणे, अंगणवाडी इमारत उभारणी, श्री नागनाथ मंदिर भक्तनिवास व सभामंडप बांधकाम तसेच अंतर्गत रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, सरपंच अनिल मुळीक, उपसरपंच दिगंबर कुंभार, अण्णाप्पा बोडगे, सदाशिव सासणे, धनाजी बेनके, नानासो बेनके, सतीश खोत, सुरेखा लोहार, सुरेखा परीट, राणी मगदूम, छाया कांबळे, मंगल बेनके, प्रकाश कांबळे, बंटू जाधव, मिलिंद पाटील, कृष्णांत पडळे, वसंतराव चव्हाण, दगडू जमदाडे, पी.डी. कुंभार, सुभाष मगदूम, दत्ता देवकुळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentários