आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये पाचगाव येथील पोवार कॉलनी परिसरातील मॉर्निंग ट्रॅक, गाडगीळ कॉलनी, मुळगाव रस्ता, श्रीराम तरुण मंडळ, द्वारकानगर, गुलमोहर कॉलनी,हरी पार्क,कोणार्क पार्क परिसरातील रस्ते डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच संग्राम पाटील,उपसरपंच विष्णू डवरी, कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ,कोअर कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य भागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments