कौतुकास्पद!
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगाव गावातील रजत रमेश काळे व अपूर्वा चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्यापद्धतीने लग्न करून या बचतीमधून गावातील कोविड सेंटरला आर्थिक व अन्नधान्यच्या स्वरूपात सुद्धा मदत केली.
उंचगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मालुताई काळे व माजी सरपंच गणेश काळे यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. अडचणीच्या वेळी सामाजिक जबाबदारी ओळखून काळे आणि चव्हाण कुटुंबीयांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल त्यांचे मनापासून आभार!
मला विश्वास आहे, प्रशासनाच्या प्रयत्नांनी आणि कोल्हापूरकरांच्या सहकार्याने आपण कोरोनाची ही लढाई निश्चितच जिंकू. यावेळी सरपंच सौ. मालुताई काळे, उपसरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच गणेश काळे, दिनकर पोवार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Comentários